घराचे इंटिरियर डिझायनिंग करण्याचे फायदे

आपण कोणाच्या घरी गेलो आणि त्यांच्या घराचं इंटिरियर डिझायनिंग आपल्याला आवडलं तर आपण विचरून माहिती जाणून घेतो. हिच त्या इंटिरियर डिझायनरच्या कामाची पावती असते.

ड्रिम्स क्रिएटरच्या मार्फत आम्ही केलेल्या कामाची अशी पावती आम्हाला आमच्या क्लायंट्सकडून मिळत असते. होम इंटिरियर्स हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्या घराच्या इंटिरियरद्वारे समोर येतात. घरी राहणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वातले अनेक कंगोरे घराच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात. प्रत्येक घराला स्वत:चे असे वेगळे व्यक्तिमत्त्व असते. जसं की, घरातील कोणाला स्पोट्समध्ये रूची असते, कोणी डान्सर असतं तर घरातील आजी-आजोबा हमखास आध्यात्मिक विचारांचे असतात. या सगळ्यांची आवड आपल्याला घरातील शोभेच्या वस्तू, फोटो फ्रेम्स यांच्या माध्यमातून प्रतीत होताना दिसते.

आपल्या घराचा आपल्याला अपेक्षित असलेला लुक साकारण्यासाठी इंटिरियर डिझायनर त्याचे कौशल्य पणाला लावतो. त्यासाठी त्याला सर्जनशीलतेबरोबरच आपले बजेट व अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा लागतो. इंटिरियर डिझायनर आपल्या घराची काटेकोर मोजमापे घेऊन, आपल्या घराचे स्ट्रक्चर दाखवणारे ड्रॉइंग बनवतो. या ड्रॉइंगला एक्झिस्टिंग सिव्हिल लेआऊट असे नाव आहे. यानंतर आपल्या कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून सगळ्यांच्या आवडीनिवडी तपासल्या जातात. बजेटची माहिती घेतली जाते व या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपला इंटिरियर डिझायनर एखादी थीम सुचवतो. ती थीम अप्रूव्ह केल्यानंतर डिझाइन बनते व या ऑप्शनपैकी एकाची निवड होऊन फायनल डिझाइन बनते. हे डिझाइन कसे दिसेल हे ऍनिमेशनच्या माध्यमातून दाखवले जाते. जेणेकरून आपण आपले घर काम पूर्ण झाल्यावर कसे दिसेल, प्लंबिंग, फॉल सिलिंग, इलेक्ट्रिकल वर्क अशी सगळी ड्रॉइंग्ज बनवली जातात.

तसेच बजेटनुसार कोणती मटेरियल्स वापरायची हेदेखील ठरवले जाते. घराचे इंटिरियर करणे ही एक लांबलचक आणि वेळखाऊ अशी प्रक्रिया आहे. योग्य इंटिरियर डिझायनरच्या साथीने आपण ही प्रक्रिया आनंददायी बनवू शकतो. आपण मेहनतीने घेतलेल्या घराचा कोपरान्कोपरा योग्य पद्धतीने वापरला जावा आणि आपण मेहनतीने कमावलेल्या पैशांचा योग्य मोबदला मिळावा असे वाटत असेल तर इंटिरियर डिझायनरचा सल्ला जरूर घ्यावा.आपल्या घराचे इंटिरियर योग्य दरात करून घेण्यासाठी तसेच ऑफर्स विषयी जाणून घेण्यासाठी आम्हाला संपर्क करा- 8484904204.

Share With

Share With

Open chat
Hello
Can we help you?